Monday, July 28, 2008
यात काही पाप नाही!
सिगारेटचा जेंव्हा तुम्ही
मजेत घेता मस्त झुरका
आवडलेल्या आमटीचा
आवाज करीत मारता भुरका
विश्वास ठेवा यात काही पाप नाही
आनंदाने जगायचं नाकरणं
याच्यासारखा दुसरा शाप नाही
जबरदस्त डुलकी येते
धर्मग्रंथ वाचता वाचता
लहान बाळासारखे तुम्ही
खुर्चीतच पेंगू लागता
विश्वास ठेवा यात काही पाप नाही
आनंदाने जगायचं नाकरणं
याच्यासारखा दुसरा शाप नाही
देवळापुढील रांग टाळून
तुम्ही वेगळी वाट धरता
गरम कांदाभजी खाऊन
पोटोबाची पूजा करता
विश्वास ठेवा यात काही पाप नाही
आनंदाने जगायचं नाकरणं
याच्यासारखा दुसरा शाप नाही
प्रेमाची हाक येते
तुम्ही धुंद साद देता
कवितेच्या ओळी ऐकून
मनापासून दाद देता
विश्वास ठेवा यात काही पाप नाही
आनंदाने जगायचं नाकरणं
याच्यासारखा दुसरा शाप
-- मंगेश पाडगावकर
Subscribe to:
Post Comments (Atom)


2 comments:
I m feeling toread first marathi blog....
धन्यवाद गुरुनाथ!
आणि तुम्ही मराठीत प्रतिक्रिया दिल्यात, तर अधिक बरे वाटेल.
लिपी देवनागरी नसली तरी!
आणखी अशाच छान कविता मी इथे संग्रह करण्याचा प्रयत्न करेन.
Post a Comment